झांबरे माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषयावर संशोधक बनू या शिबिराचे आयोजन

जुलै 21, 2022 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात चला संशोधक बनू या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. चला संशोधक बनू या हे शिबिर विज्ञान विषयावर असून शिबिराचे उद्घाटन मुळजी जेठा महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. झेड. चोपडा यांच्या हस्ते करण्यात आले.

vidhanyan

याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, त्यांनी संशोधक वृत्ती कशी वाढवावी तसेच विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती वाढवणे आवश्यक आहे. याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश प्रमुख एम. एस. नेमाडे यांनी सांगितले या शिबिराचा लाभ इयत्ता पाचवी ते नववीचे विज्ञान प्रेमी विद्यार्थी घेत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक एन. बी. पालवे, सतीश भोळे, के.आर.राणे, एम वाय ठोसरे, एस. जे. कोल्हे, सी.बी. राणे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीणी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पी.आर कोल्हे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now