मुक्ताईनगरच्या घोडसगाव शिवारात शिकारीचा थरार! वाघाकडून गायीचा फडशा

जुलै 18, 2022 12:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला करीत गायीचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेने पशूपालकांमध्ये घबराट पसरली आहे.

muktainagr jpg webp

येथील सारंग पटेल यांच्या शेतात शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यादवराव शेळके यांच्या मालकिची ही गाय होती. गेल्या काही महिन्यांपासून पट्टेदार वाघ घोडसगाव शिवारात संचार करीत आहे. वेळोवेळी वनविभाग तसेच अधिकार्‍यांना सूचना देऊनही कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी व पशू पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी रात्री वाघाने एक गायीवर हल्ला करीत तिचा फडशा पाडल्याने शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे शेतकरी यादवराव शेळके, अरुण जावरे, सुभाष जावरे, धनराज सावळे, गणेश जावरे, गजानन शेळके तसेच वनविभागाचे दिगंबर पाटील, वनमजूर टी.एन.घरजाळे, वनरक्षक नितीन खंडारे यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now