⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दुर्दैवी घटना : शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

दुर्दैवी घटना : शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । अमळनेर‎ तालुक्यातील फापोरे येथील १८ वर्षीय तरुणाचा ‎शेतात काम करताना,‎ ‎ विजेचा धक्का लागून मृत्यू ‎ झाला. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ही दुर्दैवी ‎घटना घडली.‎ ‎ फापोरे येथील राहुल‎ ‎ हिलाल मोरे (वय १८) हा ‎युवक कन्हेरे येथील‎ रतिलाल लोटन पाटील यांच्या शेतात‎ कपाशीला खत लावण्याचे काम करत होता.‎ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खत‎ लावताना, शेतात लोंबकळलेल्या वीजतारेला‎ ‎ त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा जोरदार‎ धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. सहकारी‎ मजुरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले.‎ अमळनेर पोलिसांत अकस्मात‎ मृत्यूचीकरण्यात आली आहे.‎


तीन बहिणींचा एकच भाऊ‎ मृत राहुल हा तीन बहिणींचा एकुलता एक‎ भाऊ होता. तो बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिक्षण‎ घेत होता. वडिलांची परिस्थिती हालाखीची‎ असल्याने राहुल मजुरी करून कुटूंबाला‎ आर्थिक हातभार लावत होता. त्याच्या दोन‎ बहिणी विवाहित आहेत. तर आई, वडील व‎ एका बहिणीसोबत तो राहत होता.‎


author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.