अरेरे..चोरीचे मोबाइल विकायला गेला अन् पोलिसांनी पकडले

जुलै 9, 2022 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । शिरसोली येथील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये मोबाइल चोरी केला. हा मोबाइल विक्री करण्यासाठी जात असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी बांभोरी बसस्थानकाजवळून ताब्यात घेतले आहे.

crime 2022 06 07T103039.808 jpg webp

भूषण नथ्थू बडगुजर (वय २३, रा. कढोली, ता. एरंडोल) असे संशयिताचे नाव आहे. भूषण मोबाइल चोरी करुन कढोली गावात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने एरंडोलमध्ये जावून त्याचा शोध घेतला. बांभोरी बसस्थानक परिसरातून पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

शिरसोली येथील वॉटर पार्कमध्ये उघड्या लॉकरमधून दोन्ही मोबाईल चोरी केल्याची कबुली भूषण बडगुजर याने दिली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे माेबाईल चाेरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now