७३ वर्षीय वृद्धाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

जुलै 4, 2022 2:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । एका ७३ वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 20 jpg webp

संतोष माधवराव कोळी (वय ७३) रा. उत्राण ता. एरंडोल असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे. संतोष कोळी हे उत्राण येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. ३ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपुर्वी राहत्या घरातील लोखंडी अँगलला नायलानच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

दरम्यान घरचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now