वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! भुसावळहुन धावणार पंढरपूरसाठी विशेष गाडी

जून 29, 2022 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । तब्बल दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यंदा पहिल्यांदाच पंढरीची वारी होणार आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Shree Vitthal-Rukmini) भेटीची ओढ लागली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष गाडी साेडली जाणार आहे.

train

जळगाव जिल्ह्यातील हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात व जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या लक्षात घेता भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहेत.

ही गाडी भुसावळ जंक्शनवरून ९ जुलै राेजी दुपारी १.३० वाजता सुटेल व पंढरपूरला पहाटे ३.३० वाजता पाेहाेचणार आहे. दरम्यान ही गाडी पंढरपूर येथून रविवारी १० जुलैला रात्री १०.३० वाजता सुटून भुसावळ येथे साेमवारी दुपारी एक वाजता पाेहाेचेल. ही गाडी जळगाव, पाचाेरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, काेपरगाव, बेलापूर, नगर, दाैंड, कुर्डूवाडी या स्थानकांवर थांबणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now