Damage : माथेफिरूने एटीएम मशीनला मारला दगड

जून 26, 2022 12:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । शहरातील स्वातंत्र्य चौकातील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मशीनला माथेफिरूने दगड मारून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

crime ATM jpg webp

शहरातील स्वातंत्र्य चौकातील मोहिते कार्नरजवळील आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. त्याठिकाणी राहूल शंकर पाटील (वय २९) रा. बोदवड हा सेक्यूरीटी गार्ड म्हणून नोकरीला आहे. शनिवार २५ जून रोजी रात्री ११.५० वाजेच्या सुमारास कृष्णा अनिल महाजन (वय-२६) रा. समता नगर, जळगाव हा एटीएमजवळ आला. आणि रस्त्यावरील दगड उचलून एटीएम मशीनच्या स्क्रीनवर मारून पळाला. त्यावेळी राहूल पाटील याने हटकले असता कृष्णा महाजन याने मारहाण केली.

याबाबत तात्काळ राहूल पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा महाजन याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now