आता घरबसल्या पाहता येणार ‘भूल भुलैया 2’, कसा आणि कुठे पाहाल? घ्या जाणून

जून 19, 2022 4:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 175 कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. दरम्यान, जर तुम्ही भूल भुलैया 2 बघू शकला नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Bhool Bhulaiyaa 2 OTT Release

‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. आज 19 जूनपासून हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. ‘भूल भुलैया 2’ ने बॉक्स ऑफिसवर दुप्पट कमाई केली आहे. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १७९ कोटींचा गल्ला जमविला आहे.अनीस बज्मीचा ‘भूल भुलैया 2’ हा अक्षय कुमारच्या 2007 मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हिट चित्रपटाचा सिक्वेल सुपरहिट ठरला असे फार क्वचित घडले, पण ‘भूल भुलैया 2’ ने ते करून दाखवले.

‘भूल भुलैया 2’ मध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

https://www.instagram.com/p/Ce5QyCHMb7z/?utm_source=ig_web_copy_link

सेलिब्रिटींनं केलं सिनेमाचं कौतुक

अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं, ‘या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचे तसेच चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन. तर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘भूल भूलैय्या-2 चित्रपट हिट ठरल्याबद्दल कार्तिकला शुभेच्छा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now