२३ वर्षीय युवकाने घेतला शेतातील झाडाला गळफास

जून 19, 2022 3:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । एका २३ वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे घडलीय. पवन गणेश ठाकरे (कोळी) (वय-२३, थोरगव्हाण ता. रावेर ) असे मृत युवकाचे नाव असून याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

पवन गणेश ठाकरे (कोळी) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १८ जून रोजी सकाळी पवन ठाकरे यांने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now