आयुक्तांनी केली शिवाजीनगर उड्डाणपूलाची पाहणी

जून 17, 2022 11:11 AM
जळगाव-लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी  शिवाजीनगर सह कुंभारवाडा पिंप्राळा उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करून आढावा बैठक घेतली. 

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. तत्पूर्वी या पुलाच्या कामा व्यतिरिक्त त्या लगतचे साईड मार्ग जसे पुलालगतचा जोड रस्ता, पाण्याचा निचरा होणे कामी असलेल्या गटारी, चेंबर्स आदींची पाहणी करण्यात आली.

दरम्यान आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या सोबत माजी महापौर तथा शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक शरद तायडे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, शहर अभियंता एम.जी.गिरगावकर तसेच PWD चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर  राउत यांची उपस्थिती होती. तसेच शाखा अभियंता नरेंद्र जावळे , युनिट अभियंता मनीष अमृतकर हे पुलाचे पाहणी दरम्यान उपस्थित होते.  आयुक्त गायकवाड यांनी कुंभारवाडा पिंप्राळा पुलाची सुद्धा पाहणी केली. यावेळी शहर अभियंता एम.जी गिरगावकर हे उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now