जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात महसूल पथकाला यश आले आहे. ही कारवाई एरंडोल महसूल पथकाने केली असून या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

एरंडोल तालुक्यात चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथके नियुक्त करण्यात आली असून ही पथके सक्रिय झाले आहेत गुरुवारी उत्राण गावानजीक अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स महसूल पथकाने पकडली. सदर वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहेत. तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध रेती वाहतुकी विरुद्ध धडक मोहीम सुरु आहे.













