जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । एरंडोल येथील काबरे विद्यालयाच्या प्रांगणात कोण होणार करोडपती (मराठी) या सोनी मराठी वाहिनीवर दि. ६ जून पासून प्रसारीत होणार्या टीव्ही शोच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक फाऊंडेशनच्या आरती ठाकुर यांनी केले होते. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सदर कार्यक्रम सोनी मराठीवर सुरू झाला आहे. त्याच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात शहरातून १० स्पर्धक विजेते ठरले. महिला विजेत्या स्पर्धकांना बक्षिस म्हणून नॉनस्टिक डोसा तवा आणि पुरुष विजेते स्पर्धकांना लंच टिफिन भेटवस्तू देण्यात आले. तसेच १० विजेत्यांमधून मुंबई येथे कोण होणार करोडपती कार्यक्रमास प्रेक्षक म्हणून दोन लोकांना गोल्डन इंट्री पास देण्यात आले. कार्यक्रमास शहरातील असंख्य नागरीकांनी उपस्थिती देवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ३ महिला विजेतींमध्ये गौरी मानुधने, रा. ति. काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने, नम्रता जाखिटे, मिरा जाखिटे तसेच ७ पुरुषांमध्ये हर्षल निकम, पत्रकार कुंदन सिंह ठाकुर, सागर पाटील, चेतन पाटील, गोपाल राठोड, सचिन महाजन, सिध्देश्वर शिंपी असे १० स्पर्धक विजेते ठरले.













