जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । राज्यासह देशात पुन्हा कोरोनाने डोक वर काढावयास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आवाहनानुसार एरंडोल येथील ग्रामीण रूग्णालय आणि एरंडोल नगरपालिकेतर्फे शहरात हर घर दस्तक 2.0 मोहिम अंतर्गत कोविल-19 चे लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेत लसीकरणाचे 1 ला, दुसरा आणि 3 रा (मास्टर डोस) देण्यात येत आहे.
मोहिमेअंतर्गत काल दांगी हॉल, जाखिटे भवन, मुल्लावाडा समाज मंदिर येथे लसीकरण मोहीम घेण्यात आली होती. लसीकरणासाठी तालुका चिकित्सक डॉ. फिरोज शेख आणि नगरपालिकेच्या व ग्रामीण रुग्णालयचे कर्मचारी डॉ. योगेश सुकटे, अशोक मोरे, सलिम शे. पिंजारी, रिना बोरेले, पुनम धनगर, धिरज खैरनार, विनोद जोशी, समाधान महाजन, ऋषीकेश पाटील, अशोक चौधरी आदी परिश्रम घेत आहेत. लसीकरणावेळी परदेशी समाज अध्यक्ष निरंजन परदेशी, उपाध्यक्ष विवेक परदेशी, खजिनदार विपीन परदेशी, पत्रकार कुंदनसिंह ठाकुर, ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुकाध्यक्षा आरती ठाकुर आदी उपस्थित होते. वाढत्या कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद द्यावा असे आवाहन तालुका चिकित्सक डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधिारी डॉ. कैलास पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले आहे.