जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत भुसावळ पॅसेंजर अखेर उद्या म्हणजेच ८ जूनपासून धावणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. मात्र कोरोना कमी झाल्याने रेल्वेकडून अनेक गाड्या सुरु करण्यात येत आहे.त्यात आता सुरत-भुसावळ पॅसेंजर होत असलयाने खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांची माेठी गैरसाेय दूर होणार आहे.
देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानतंर रेल्वेकडून विशेष आरक्षित गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पॅसेंजर गाड्या बंद असलयाने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. भुसावळ येथून गेल्या काही महिन्यापूर्वी पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यात मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजर बंदच होती. मात्र आता रेल्वेने सुरत-भुसावळ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची माेठी गैरसाेय दूर होणार आहे.
गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहाेचणार आहे. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सुरत स्थानकात पोहोचणार आहे.
सुरतहून रात्री ११.१० वाजता सुटणार पॅसेंजर
ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१०, भुसावळ ७.५५ वाजता पोहोचल.
गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर :
ही गाडी ९ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५, व्यारा २.३१, बारडोली ३.४३, उधना ४.३५, सुरत पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल.