जळगाव शहर
बांभोरीची तबिता पाटील सौंदर्य स्पर्धेत विजेती
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची २०२२ या सौंदर्य स्पर्धेत बांभोरी येथील तबिता पाटीलने विजेतेपद पटकावले. गौरी नाईक आणि जयंत पाटील यांनी या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
ग्रँड फीनालेचा सोहळा बोट क्लब पुणे येथे झाला. ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मिस. वर्ल्ड रोहित खंडेलवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप बोरावके, गौरी नाईक, प्राची भावसार , चैतन्य गोखले व चैताली नेहेते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भारत सुरती यांनी मेन्स डिझाइनर पार्टनर व बेनविन कुटिनो यांनी लेडीज डिझायनर पार्टनर म्हणून सहकार्य केले. महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.