एरंडोलच्या डॉ. जुमाना बोहरी यांचा निमचमध्ये सन्मान

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । एरंडोल येथील बोहरी फिजिओथेरपी आणि फिटनेस सेंटर च्या संचालिका डॉ. जुमाना बोहरी यांचा नीमच (मध्य प्रदेश) येथे सन्मान करण्यात आला.

erandol 14

राष्ट्रीय स्तरावरील मिश्र मार्शल आर्ट या स्पर्धेत सभागी होणाऱ्या स्पर्धकांना मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात खेळताना दुखापत होऊ नये, यासाठी डॉ. जुमाना बोहरी यांनी मार्गदर्शन केले होते. त्याच्या या उप्लब्धतीचे एरंडोल परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन आणि स्वागत करण्यात येत आहे. डॉ. जुमाना बोहरी यांनी अनेकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीत स्तरावरील स्पर्धांमध्ये, परिषदामध्ये सहभाग नोंदविला आहे. त्या एरंडोल येथील दंत चिकित्सक डॉ. इब्राहिम बोहरी यांच्या पत्नी तर उद्योजक सैफुद्दीन बोहरी यांच्या सून आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now