जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । महानगरपालिका व ग्रीन ह्युमन फाउंडेशनतर्फे शिवाजी उद्यानात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाटल्या, प्लास्टिक, कागद आदी ५० किलो कचरा जमा करण्यात आला.

जिल्हा समन्वयक महेंद्र पवार यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ या मोहिमेंतर्गत कचरा रस्त्यावर न टाकता कचरा पेटीत टाकण्याचे आवाहन केले आहे. ग्रीन ह्युमन फाउंडेशनचे सर्व सदस्य दररोज पहाटे ६ वाजता उठून शहराच्या वेगवेगळ्या भागात मोहीम राबवून घंटागाडीद्वारे कचरा गोळा करतात. प्रियंका कौराणी, रूपाली किरंगे, काजल सैनी, अंजली रामचंदानी, उदय नेरकर, विक्की पाटील, हितेश शिंपी, कृष्णा पाटील, प्रतीक बारी, समीर चौधरी यांचे याकामी सहकार्य आहे

स्वच्छता मोहिमेत सदस्यांतर्फे गोळा करण्यात आलेला ५० किलो कचरा.










