दुर्दैवी : कंटेनर इलेक्ट्रीक डीपीवर धडकला, चालकाचा मृत्यू

एप्रिल 16, 2022 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । कंटेनर रिव्हर्स घेतांना अंदाज न आल्याने डीपीला वाहन धडकून विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी खेडी पेट्रोल पंपानजीक घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. जगदीशसिंह बोरा वय-३८ रा.उत्तराखंड असे मयताचे नाव आहे.

shock 1

शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आरजे.०९.जीसी.२५९७ हा कंटेनर उभा होता. कंटेनर चालक जगदीशसिंह बोरा वय-३८ रा.उत्तराखंड हे सकाळी कंटेनर रिव्हर्स घेत बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना मागील बाजूला असलेल्या डीपीचा त्यांना अंदाजा आला नाही. कंटेनर मागे घेताना थेट डीपीवर आदळला. काहीतरी आवाज झाला म्हणून जगदीशसिंह खाली उतरले आणि त्यांनी पाहणी करून घाईघाईत पुन्हा कंटेनरमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक डीपीवर मोठा जाळ होऊन शॉर्टसर्किट झाला. जगदीशसिंग यांना जोरात विजेचा झटका बसल्याने ते खाली कोसळले.

विजेचा तीव्र धक्का लागून जगदीशसिंह यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने त्यांचा मृतदेह एका बाजूला केला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयत चालकाचा मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविण्यात आला असून एमआयडीसी पोलिसात नोंद करणे सुरु आहे.

पहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद धक्कादायक प्रकार :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1017821262199776

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now