‘दलित पँथर’ची समिती गठीत

एप्रिल 12, 2022 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । येथील दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीची सभा नुकतीच पार पडली. संघटनेला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

samiti 1 jpg webp

समितीत मुख्य निमंत्रकांमध्ये जयसिंग वाघ, वसंत सपकाळे, प्रतिभा शिंदे, मिलिंद केदार, चैतन्य नन्नवरे यांची निवड करण्यात आली. प्रा. डॉ. सी. पी. लभाने, प्रा. देवेंद्र इंगळे, बळवंत भालेराव, प्रकाश सरदार, प्रा. सत्यजित साळवे, दिलीप सपकाळे, सतीश निकम, प्रकाश बारी, प्रा. सुहास बागुल, सचिन धांडे, सल्लागार प्राचार्य यशवंत मोरे, चंद्रशेखर अहिरराव, विजय पवार यांची नेमणूक करण्यात आली. समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सुबोध मोरे यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now