गाेदावरी अभियांत्रिकीचे उद्या रंगणार स्नेहसंमेलन

एप्रिल 11, 2022 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । येथील गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स-२२ हा टेक्निकल इव्हेंट तर उल्हास २०२२ हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दि १२ व १३ एप्रिल रोजी होणार आहे. स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी झाली असून रंगत येणार आहे.

godavari jpg webp

फिनिक्स २०२२मध्ये शार्क टैंक, मिनी हॅकेथॉन, क्विझ स्टार, जंक यार्ड व अ‍ॅडमॅड शो अशाप्रकारचे इव्हेंट आहेत. त्यात जळगावसह धुळे, मलकापूर, बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख व समन्वयक परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनोरंजन व कला दर्शनासाठी उल्हास २०२२ कार्यक्रम १३ एप्रिल रोजी होणार आहे. त्यात विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now