प्रा. डॉ. घाेरपडे ‘मिलिंद सन्मान’ पुरस्काराणे सन्मानित

एप्रिल 9, 2022 2:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. विजय घोरपडे यांना नुकताच राज्यस्तरीय ‘मिलिंद सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ghorpade

औरंगाबाद येथे मिलिंद नागसेन स्टुडंट वेल्फेअर सोसायटीतर्फे मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात नागसेन फेस्टीव्हलचे आयोजन केले होते. त्यात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विषयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा फुले आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक प्रा. डॉ. उत्तम अंभोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, गायक प्रतापसिंग बोदडे, प्रा. किशोर वाघ, सिद्धार्थ मोकळे, सचिन निकम उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now