यावल तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र

मार्च 19, 2022 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । यावल (Yawal) तालुक्यातील कासवे (Kasave) ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण बांधकाम करून रहिवास केल्याप्रकरणी दोन सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी असे अपात्र ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहे. हा निर्णय महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (Shubhangi Bharade) यांनी दिला.

collecter office jpg webp

याबाबत असे की, यावल तालुक्यातील कासवे येथे ग्रा.प.सदस्य लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण बांधकाम करून रहिवास करीत आहेत. त्यानुसार त्यांना अपात्र करण्यात यावे, आणि ग्राम पंचायत सदस्य लताबाई सपकाळे आणि पवन कोळी तसेच ग्रामसेवक यांच्या विरोधात विनोद श्रावण कोळी यांनी ग्राम पंचायत विवाद अर्ज क्र. ५२/२०२१ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

या तक्रार अर्ज सुनावणीअंती लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांनी ग्रा.पं. जागेवर अतिक्रमण केल्याचे सुनावणीदरम्यान सिद्ध झाले. त्यानुसार लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी हे महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम १९५९ कलम १४जे -३ व १६ नुसार कासवे ग्रा.प. सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय महसूल उपजिल्हाधिकारी भारदे यांनी दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now