जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील कोरपावली येथे दलित वस्तीसाठी सार्वजनिक महिला शौचालयकामी मंजूर झालेली रक्कम सहा लाख रुपये असून हे बांधकाम दलीत वस्तीत न करता दहिगाव रस्त्यावर असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये करण्यात आले आहे.

शौचालयाचे बांधकाम नियमबाह्य आणि फक्त सरकारी निधी लाटण्यासाठी केल्याची चर्चा होत आहे. तसेच इस्टीमेटनुसार बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे काम कलेले दिसून येते. अशा प्रकारे संबंधीत अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी दलित बांधव व गावकऱ्यांकडून होत आहे.













