
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । आमच्या मुलीला तुमच्या मुलाने पळवून नेल्याचा आरोप करत मुलगी दोन तासात परत आली नाही तर घर जाळून टाकण्याची धमकी, शिवीगाळ व लोखंडी पाईपाने मारहाण करणा-या पाच जणांविरुद्ध महिलेच्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन सर्वानंद राजपाल, रोश सर्वानंद राजपाल, मुन्ना सर्वानंद रजपाल, अंजु शंकर राजपाल, करू मुन्ना राजपाल सर्व रा. सिंधी कॉलनी जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहराच्या सिंधी कॉलनी परिसरात 15 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पाच जणांच्या मारहाणीत महिला जखमी झाली आहे. महिलेचे घर जाळून टाकण्याच्या उद्देशाने पुन्हा आलेल्या आरोपींनी सोबत रॉकेल आणल्याने तणाव निर्माण झाला होता.
संपूर्ण प्रकार दि.१४ रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. घटनास्थळी फौजदार अनिस शेख यांनी भेट देत तणावपुर्ण परिस्थिती आटोक्यात आणली. सहायक फौजदार राजेंद्र उगले यांनी सदर गुन्हा दाखल केला असून पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रमोद कठोरे पुढील तपास करत आहेत.
हे देखील वाचा :
- जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! आमदार राजूमामा भोळेंच्या पाठपुराव्याला यश
- अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात वसुबारस उत्साहात; डॉ. महाले दाम्पत्याच्या हस्ते गोमातेचे विधिवत पूजन
- शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
- जळगावकरांनो लक्ष द्या! दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी वेळ ठरली; नियम मोडल्यास…
- मध्य रेल्वेत अप्रेंटिसच्या २८६१ जागांसाठी भरती; भुसावळ विभागात ५०० पदे





