नोकरी संधी

मध्य रेल्वेत अप्रेंटिसच्या २८६१ जागांसाठी भरती; भुसावळ विभागात ५०० पदे

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांच्या तब्बल २ हजार ८६१ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये भुसावळ विभागासाठी ५०० जागा राखीव असल्याने जळगाव आणि परिसरातील उमेदवारांसाठी ही विशेष महत्त्वाची संधी आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. Central Railway Apprentice Bharti

मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये अप्रेंटिस पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामध्ये मुंबई विभागात १ हजार ७१२, भुसावळ विभागात ५००, पुणे विभागात २७१, नागपूर विभागात २२१ आणि सोलापूर विभागात १५७ जागा उपलब्ध आहेत.

भुसावळ विभागात ५०० जागा
या भरतीमध्ये भुसावळ विभागासाठी तब्बल ५०० अप्रेंटिस पदे उपलब्ध असल्याने जळगाव, भुसावळ तसेच उत्तर महाराष्ट्रातील पात्र तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. रेल्वेच्या भुसावळ विभागात अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेण्याची संधी या भरतीतून मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमध्ये NCVT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, टर्नर, मेकॅनिक, वायरमन, स्टेनोग्राफर यांसह विविध ट्रेडसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा
३ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती?
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

२ डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. रेल्वेत अप्रेंटिस प्रशिक्षणाची संधी मिळवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रियेतील अटी तपासूनच अर्ज करावा.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button