ब्रेकिंग : शिवसेनेचा भाजपला दणका, जळगाव मनपाचे ४ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । शहर मनपातील काही नगरसेवकांनी भाजपशी बंडखोरी करून शिवसेनेशी घरोबा केला होता. काही दिवसांपूर्वी पुन्हा काही नगरसेवकांनी घरवापसी करीत बांधली होती. दरम्यान, मनपातील शिवसेनेचे बहुमत कमी झाल्याने चिंता वाढली होती. सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून ४ नगरसेवकांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

shivsena pravesh jpg webp

जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या इकडून-तिकडे उड्या सुरूच असून नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.

पुन्हा भाजपात गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. शुक्रवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, ऍड.दिलीप पोकळे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.

शिवसेना भाजपला धक्का देण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरली असून भाजप आपल्या नगरसेवकांना आपल्याकडे रोखून ठेवण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. शिवसेनेचे बहुमत वाढल्याने आगामी महासभेत आणि इतर निर्णय घेतांना शिवसेनेला सहज शक्य होणार आहे.

हे देखील वाचा :

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now