
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेला हादरवणारी घटना समोर आली असून राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस प्रशासन सतर्क झाले. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) न्यायालयाच्या इमारतीसह संपूर्ण परिसराची तपासणी केली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळून आली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
सोमवारी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय ठिकाणाला धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत न्यायालय परिसराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले.
धमकीच्या ई-मेलची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने न्यायालयात दाखल होत इमारत आणि परिसराची घातपातविरोधी तपासणी केली. न्यायालयातील विविध दालने, महत्त्वाच्या जागा आणि संभाव्य संवेदनशील भागांची बारकाईने पाहणी





