---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

कंपनीच्या बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । कंपनीत काम करीत असताना बाथरूममध्ये कर्मचाऱ्यास हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती. संजय रामदास माळी (महाजन, वय ४५, रा. आसोदा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, संजय माळी यांचा ड्यूटीवर असताना मृत्यू झाल्याने त्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली हाेती. त्यानुसार कंपनीने मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे.

sanjay mahajan jpg webp

याबाबत असे किम संजय माळी हे उमाळा फाट्याजवळील स्पेट्रकम कंपनीत गेल्या १२ वर्षांपासून नोकरीला होते. सोमवारी दुपारी ३ वाजता ते ड्यूटीवर गेले. रात्री ७.३० वाजता कंपनीतील बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. बाथरूमचा दरवाजा मधून बंद असल्याने बराच वेळ होऊनही ते बाहेर येत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. या वेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले.

---Advertisement---

बेशुद्धावस्थेतील माळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणत असताना कंडारी फाट्यावर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कामावर असताना त्यांना मृत्यू झाल्याने भरपाई देण्याची मागणी केली. मदत दिल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानुसार कंपनीतर्फे मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच इतर लाभदेखील वेळेत देण्याचे आश्वासन देण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---