---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

चोरीच्या दोन बुलेटसह दोन जण पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. याच दरम्यान, बुलेट चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहे. जावेद शेख चांद (रा. मास्टर कॉलनी) अदनान अमजद खान (रा. शाहुनगर जळगाव) असं अटक केलेल्या दोघांचे नाव आहे.

bulet chor

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील बाबा कॉलनीतून १३ नोंव्हेबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हर्षद दिलीपकुमार नाकपाल यांच्या मालकीची बुलेट (क्रमांक MH-19 CH-4898) त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी झाली होती. या प्रकरणी नाकपाल यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

---Advertisement---

गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार पोना किशोर पाटील यांना सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करून गोपनीय बातमीच्या आधारे संशयित जावेद शेख चांद, रा. मास्टर कॉलनी, अदनान अमजद खान रा. शाहुनगर जळगाव यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

पोलिस कोठडीत असताना दोन्ही संशयितांनी बुलेट क्र. MH-19 CH 4898 ही सिंधी कॉलनी बाबा नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दिसत असल्याने आरोपी जावेद शेख चांद याची पुन्हा 02 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी रिमांड घेतली. रिमांड दरम्यान त्याने पुन्हा एक काळ्या रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर बुलेट सुद्धा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment