जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील संगणक, माहिती तंत्रज्ञान, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागांतर्गत सॅप इआरपी सॉफ्टवेअर व सॅप सर्टीफाईड कन्सल्टंट या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्टीफाईड फायनान्स कन्सल्टंट व असेंजरचे टीम लीडर विनय राखेचा, रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. विध्यार्थ्यानी संगणक क्षेत्रातील नवनवीन बाबी शिकाव्यात व त्यातील कौशल्य अवगत करावे तसेच रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते असे यावेळी नमूद केले. आपल्या मार्गदर्शन व्याख्यानात विनय राखेचा यांनी सॅप इआरपी हे जर्मन कंपनी सॅप एसइ ने विकसित केलेले एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर आहे. एसएपी ईआरपी संस्थेची प्रमुख व्यावसायिक कार्ये समाविष्ट करते. सॅप इआरपी (V.6.0) ची नवीनतम आवृत्ती 2006 मध्ये उपलब्ध करण्यात आली होती. सॅप इआरपी 6.0 साठी सर्वात अलीकडील सॅप एन्हांसमेंट पॅकेज 8 2016 मध्ये रिलीज करण्यात आले होते. सॅप इआरपीमध्ये विध्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी शाहनवाज सय्यद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अनुष्का जाधव यांनी आभार मानले. सदर ऑनलाईन कार्यशाळेत २०० विध्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. हिरालाल सोळुंके, प्रा. शीतल जाधव, प्रा. अभिषेक ढोरे, प्रा. राहुल राउत यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल