जिल्ह्यात ३२ बोगस व्हेटरनरी डॉक्टर, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

फेब्रुवारी 18, 2022 8:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात असंख्य बाेगस व्हेटरनरी डाॅक्टर्स कार्यरत असून ते पात्रता व क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून मुक्या जीवांशी खेळून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. अशा तब्बल ३२ डाॅक्टरांची नावे माेबइल नंबरसह देवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशिर कारवाई करावी, अशी तक्रार जिल्हा दूध संघात कार्यरत डाॅ. पंकज राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

doctro jpg webp

विशेष म्हणजे या तक्रारीला पंधरा दिवस लाेटले तरी जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे कारवाई करण्यात आलेली नाही.बोगस पशुवैद्यकीय प्रक्टीस करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली असून ती महाराष्ट्र स्टेट व्हेटरनरी कौन्सिल, नागपूर कार्यालयाकडे पाठवली आहे. काही शस्त्रक्रिया करणारे बोगस डॉक्टर हे अनाधिकृतपणे केटामाइन, झायलेक्झीन, लिग्नोकेन, सिक्वील व प्रोफोफॉल असे प्राण्यांना बेशुध्द करण्यासाठी लागणारे शेडयुल एचचे ड्रग स्वत: जवळ बाळगून नाकोटीक ड्रग्ज ऑक्टप्रमाणे गंभिर स्वरुपाचे गुन्हे करत आहेत.

यांच्या विरुद्ध आहे तक्रार

चाळीसगाव तालुका : प्रविण पाटील, जितेंद्र पाटील, सोमाग चरेकर , विरेंद्र शिंदे, दीपक शेवाळे. पाचोरा तालुका : सुधाकर शेळके. पारोळा तालुका : बाळू राठोड, प्रसाद जडे, बत्तू पाटील. भडगाव तालुका : गोकुळ पाटील, कुणाल पाटील, नीलेश राठोड, श्रीकांत पाटील, नितीन पाटील, भूषण पाटील. चोपडा तालुका : रामचंद्र छगन सोनवणे, लखीचंद रुपचंद महाजन, रवींद्र कोळी, मुकलाल कोळी. एरंडोल तालुका : अभय देसले, सागर पाटील. बोदवड तालुका : शुभम माळी, गजानन कन्हेरकर. भुसावळ तालका : अशीर शेख, सुधाकर वानखेडे, शेख साजीद, शेख समीर. जामनेर तालुका : प्रफुल्ल डांगे.

दाेघांवर असे आराेप

पाराेळा तालुक्यातील बाळू राठाेड यांच्यावर माणसांवर उपचार करीत असल्याचा आराेप डाॅ. राजपूत यांनी केला आहे. तर प्रसाद जडे यांचा पशुवैद्यकीय काेर्स झालेला नसताना ते अनाधिकृत प्रॅक्टीस करीत असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, तक्रारदार हा पशुवैद्यकीय पदवीधर आहे. त्यांच्या तक्रारीवरून चाैकशी किंवा कारवाई करता येणार नाही. समजा एखाद्या पशुपालकाने तक्रार केल्यास संबधित तालुक्याच्या अधिकाऱ्यास चाैकशी करण्याच्या सूचना दिल्या जातील. – सदाशिव शिसाेदे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now