जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । सावदा येथील आठवडे बाजारात चरणाऱ्या बकरीची कारमध्ये घालून चाेरी करणाऱ्या चोरट्यांचा एका तरुणाने माेटारसायकलवरून सिनेस्टाईल पाठलाग केला. कार जवळ येताच त्याने दुचाकीवरून कारवर झेप घेतली. या दरम्यान कार झाडावर आदळल्याने कारचालक व त्याचा साथीदार पसार झाले असून पाेलिसांनी कार जप्त केली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.

येथील आठवडे बाजारात साेमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंपरुड फाट्यापासून आठवडे बाजारात जेथे बकऱ्या चरतात त्या ठिकाणी कार (क्र. एमएच ०२ एवाय ५१२९) येऊन थांबली. कार चालकाने चौफेर नजर टाकून काेणी नसल्याची खात्री केली. त्यानंतर कार चालकाने साथीदाराच्या मदतीने कारच्या उघड्या फाटकाजवळ बकऱ्यांसाठी चारा टाकला. ताे खाण्यासाठी बकरी येताच तिला कारमध्ये ओढले. ते झाडाखाली बसलेल्या सय्यद हसन या युवकाने पाहिले. त्याने मोटारसायकलवरून त्या कारचा पाठलाग सुरू केला. कार जवळ येताच मोटारसायकल सोडून त्याने कारवर झडप घेत कार चालकाला पकडले. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटताच कार आठवडे बाजारातील गटारीवरून झेपावत झाडावर आदळली. त्यावेळी कार चालक व त्याचा साथीदार लगेच पसार झाले.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ









