जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बसस्थानकामागील टपरीच्या आडोशाला रोहिदास बापू पाटील (रा.शिरसोदे, ता.पारोळा) हा २१ रोजी सकाळी सट्टा खेळताना आढळला होता. त्याच्याकडून १७१० रुपये रोख व मटका सट्ट्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व एक कार्बनचा तुकडा असे साहित्य आढळले होते.

पारोळा पोलिसात पोलिस काँन्स्टेबल शशिकांत निकम यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कलम १२ (अ) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक योगेश जाधव, नाना पवार, किशोर पाटील, सुनील साळुंके यांनी ही कारवाई केली. परिसरात पोलिसांनी सातत्यपूर्ण कारवाई करून, अवैध व्यावसायिकांवर आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






