नगरभूमापन कार्यालयाबाहेरच शिपाई-बांधकाम व्यावसायिकाची हाणामारी

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या नगर भूमापन कार्यालयातील शिपायाने कार्यालयाच्याच बाहेर बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची ध्वनीचित्रफित चर्चेचा विषय झाली आहे. सहायक पोलिस अधीक्षकांनी ही चित्रफित पाहून पोलिस अधिकाऱ्यांना तिथे पाठवल्यानंतर परस्परविरोधी गुन्ह्याची नोंद केली आहे.

crime 5 jpg webp

शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रभाकर खर्चे शुक्रवारी दुपारी ७/१२ चा उतारा काढण्यासाठी नगर भूमापन कार्यालयात गेले होते. तिथे त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यावरून कार्यालयातच वाद सुरू झाला. त्याच कार्यालयातील शिपाई सचिन लक्ष्मण महाले यांच्याशी झालेल्या झटापट झाली. उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी त्यांना सचिन महालेच्या तावडीतून सोडवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका उपस्थिताने या सर्व घटनांची मोबाईलमध्ये चित्रफित तयार केली आणि ती सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना पाठवली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामदास वाकोडे हे नगरभूमापन कार्यालयात आले. दोघांविरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now