जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील खेडी बुद्रुक, पिंप्राळा व श्रीराम कॉलनीतून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पहिली चोरी खेडी बुद्रुक येथील प्रमोद रवींद्र पाटील यांच्या मालकीची एमएच १९ एएल ११२५ क्रमांकाची दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी पिंप्राळ्यामधील चौधरी वाड्यातील रहिवासी ठगूबाई सुकलाल भोई यांच्या मालकीची एमएच.१९.डीबी. २६१६ क्रमांकाची दुचाकी ही १९ जानेवारीच्या मध्यरात्री घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली तर तिसरी आसोदा रस्त्यावरील श्रीराम कॉलनीतील प्रद्युन्न निवृत्ती बोरसे यांचीदेखील एमएच.१९.बीडी. ८१०० क्रमांकाची दुचाकी ही दि. १७ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी रामानंदनगरसह शनिपेठ पोलीस ठाण्यात दुचाकी गुन्हा दाखल आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






