जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी अटक केलेल्या तीन संशयितांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. दरम्यान, तिन्ही संशयितांनी यापूर्वी परिवहन विभाग व एनआयसीच्या साइटवरही फेरफार केल्याचा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटकेतील तीनही संशयितांना न्यायालायने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अशोक विठ्ठल पाटील, अकिल शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ भाेळे या तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे.
अशोक पाटील यांचा माेबाइल ओटीपीसाठी वापरला गेला आहे. दरम्यान, आरटीओ एजंट पप्पू भोळेने हा मोबाइल वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अकिल नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला असल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या तीनही संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी न्यायालयास महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. त्यात संशयितांनी एनआयसी (नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर) या साइटवरही फेरफार केल्याचा तसेच परिवहन विभागाच्या पोर्टलवर यापूर्वीदेखील अशा प्रकारे वाहनांचे बेकायदेशीर ट्रान्सफर केल्याचा संशय आहे. हा गुन्हा आमदार संजय सावकारे यांच्याशी संबंधित असून, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर कार ट्रान्सफर केली आहे. काळ्या यादीतील वाहनांचे ट्रान्सफर करून त्यांना नियमित केले असल्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






