जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । शहरातील फुले मार्केट मधील चार दुकानांच्या बाहेर सुरू असलेले लाईट चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री लांबविले खरे, पण ही चोरी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकणारी दुकानदारांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये अविनाश वर्मा यांचे मार्केटच्या तळमजल्यावर गाळा क्रमांक ८६ येथे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर सुरू असलेले दोन लाईट शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी प्रकार समोर आला. यावेळी शर्मा यांच्यासह मार्केटमधील प्रदीप मंडोरे यांचे दुकानाबाहेरील ४ लाईट, श्री फैशन या दुकानाचे ६ लाईट तर शिवा कॉस्मेटिक या दुकानाचा एक मोठा लाईट असे एकूण ११ लाईट चोरट्यांनी चोरून नेल्याचेही समोर आले.

दरम्यान शर्मा यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे. यात चार ते पाच तरुण येतांना, त्यानंतर लाईट काढून हातात घेऊन जातांना दिसून येत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






