जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । शहरातील सिंधी कॉलनीतील कंवर नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हरिश खियलदास रावलानी (वय ५५ ) असे घर मालकाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हरिश रावलानी यांचे बळीराम पेठेत के.डी.सन्स नावाचे रेडिमेड कापडाचे दुकान आहे. गणपती नगरात साकार अपार्टमेंटमध्ये त्यांनी नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. १० जानेवारी रोजी कंवर नगरातील घरातील साहित्य नवीन घरात हलविण्यात आले होते. त्यादिवशी रात्र झाल्याने काही साहित्य जुन्याच घरात राहू दिले होते. रात्री अकरा वाजता या घराला कुलूप लावून हरिश कुटुंबासह नवीन घरात वास्तव्याला आले तर जुन्या घरी वरच्या मजल्यावर आई-वडील वास्तव्याला होते. शनिवारी सकाळी राहिलेले साहित्य घेण्यासाठी गेले असता, दरवाजाचे कुलूप तुटलेले होते तर कडी उघडी होती. घरात जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. हा प्रकार पाहून हरिश यांनी आई, वडील यांना खाली बोलवन घर बंद असताना कोणी आले होते का ? अशी विचारणा केली, त्यावर त्यांनी आम्हाला माहिती नाही असे सांगितले.

दरम्यान, कपाटातील साहित्य तपासले असता १ लाख रुपये किंमतीची २० ग्रॅम सोन्याची चेन, चांदीचे पायल, एक चांदीची अंगठी, तीन हजार रुपये रोख असा १ लाख ४ हजार १५०० रुपयांचा ऐवज गायब होता. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर हरीश यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार वंजारी व योगेश बारी करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






