जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । शहरतील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच डॉ.राकेश पितांबर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. राकेश पितांबर चौधरी हे याच समाजकार्य महाविद्यालयात गेल्या २१ वर्षांपासून असोसिएट प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक म्हणून महाविद्यालयास ‘A’ श्रेणी प्राप्त करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

समाजकार्य महाविद्यालय जळगावच्या पुर्ण वेळ प्राचार्य पदी डॉ. राकेश पितांबर चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. शिरिषदादा चौधरी व सचिव डॉ. पी. आर. चौधरी यांनी देखील त्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संपूर्ण मधुस्नेह परिवार तसेच समाजकार्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्याकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तसेच डॉ. राकेश पितांबर चौधरी यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल आप्तेष्ठ, मित्र परिवार व समाजकार्य महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?










