जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव येथील गुन्हा शाखेच्या वतीने नायलॉन मांजा विक्री प्रकरणी कासोदा येथील वसंत किराणा स्टोअर्सचे मालक किरण वसंत वाणी व योगेश जनरल स्टोअर्सचे मालक योगेश सुभाष वाणी यांच्याविरुद्ध जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सतीश प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रसंगी त्यांच्यासोबत भगवान तुकाराम पाटील पोलीस नाईक जळगाव गुन्हे शाखा, नंदलाल दशरथ पाटील, राहुल बैसाणे यांनी सदर कारवाई केली. कारवाई करतेवेळी दोघा दुकानांमध्ये १०३८ रुपयाच्या प्लास्टिक पिशवी मध्ये ठेवलेले नायलॉन माझा प्रत्येकी दहा रुपये किमतीचे शंभर बंडल कारवाई करतेवेळी आढळून आले.

पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल युवराज कोळी हे करत आहेत.
हे देखील वाचा :
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
- भडगाव हादरले ! दारूच्या पैशांवरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पती अटकेत







