कोरोनाचा विस्फोट! जिल्ह्यात आज तब्बल ३७७ नवे रुग्ण आढळले

फेब्रुवारी 18, 2022 10:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कारण आज शनिवारी जिल्ह्यात तब्बल ३७७ नवे रुग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरासह भुसावळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आज ४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

corona

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार ८०५ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८४६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५८० कोरोना बाधित रूग्णाचा उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण
यात जळगाव शहर-१५५, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-१४४, अमळनेर-१३, चोपडा-१५, पाचोरा-१, भडगाव-७, धरणगाव-१, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

हे देखील वाचा :

    चेतन पाटील

    पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now