Corona Update : जळगाव जिल्ह्यात आज २६६ नवे रुग्ण आढळले

फेब्रुवारी 18, 2022 10:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतीच आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २६६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहे. त्यामुळे जळगावकरांनी आता खबरदारी घेतले पाहिजे.

corona (1)

गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी आढळून येत होती. परन्तु आज जळगाव शहरात १११ रुग्ण आढळून आले आहे. आज २६६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ लाख ४४ हजार ४२८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३३३ रूण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ५१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८० बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात-१११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७१, अमळनेर-६, चोपडा-३५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now