⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | कविता समाज मनाशी संवाद साधणारी हवी : प्रा.डॉ.बी.व्ही.पवार

कविता समाज मनाशी संवाद साधणारी हवी : प्रा.डॉ.बी.व्ही.पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । कवितेचा समाजाशी, माणसांशी संवाद असला म्हणजे सामाजिक जगण्याला, माणसाच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. जगण्याच्या तर्‍हा साहित्यांत आल्या की, माणसाला, वाचकाला साहित्य आपले वाटू लागते. बालवयापासून अभ्यासणारे साहित्य त्या त्या वयपरत्वे माणसाची जडणघडण करीत असल्याचे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.बी.व्ही.पवार यांनी केले.

एरंडोल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन, अध्ययन व विस्तार विभाग (जळगाव) व औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने ३० डिसेंबर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मोहन बी. शुक्ला होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी औदुंबरची वाटचाल विषद करतांना कवी आणि साहित्यिकांचे  समाज प्रबोधनासाठी असलेल्या योगदान आणि साहित्यिकांची भविष्यकालीन भूमिका स्पष्ट केली. आणि औदुंबरच्या भावी योजनांची सविस्तर माहिती दिली. विचारमंचवर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी. आर. पाटील, डॉ.महेश घुगरी, कविसंमेलनाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, अरुण माळी, प्रा.डॉ.के.के.अहिरे, कवी व साहित्यिक अ‍ॅड.विलास मोरे, प्रा.वा.ना. आंधळे, डॉ.अ.फ.भालेराव , बी. एन.चौधरी उपस्थित होते. यावेळी अ.फ.भालेराव, बी.एन. चौधरी, भिमराव सोनवणे, यांचे प्रसंगोचित सत्कार करण्यात आले .

डॉ. बागूल म्हणाले की, लिहिणारा कवी, लेखक हा आपल्या लेखणीतून जे मांडत असतो, त्या मांडणीला अर्थपूर्णता येण्यासाठी समीक्षकांनी, परीक्षकांनी दिशा दिली पाहिजे. उमलणार्‍या साहित्याला साद घातली पाहिजे. याउलट त्या बहरणार्‍या साहित्याला ‘मी’पणाच्या अहंकारापायी नाकारणे योग्य नव्हे; त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
अ‍ॅड. विलास मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.वा.ना.आंधळे यांनी सूत्रसंचालन केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन निंबा बडगुजर यांनी केले, तर जावेद मुजावर व रवींद्र लाळगे यांनी आभार मानले तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कविसंमेलनात प्रा.डॉ. प्रदीप सुरवाडकर, प्रा. विमल वाणी, सुरेखा महाजन, इंदिरा जाधव, शीतल पाटील, प्रकाश पाटील, भीमराव सोनवणे, पं. ना. पाटील, डी. डी. पाटील, धनराज सोनवणे, प्रा. पी. डी. चौधरी, भागवत सूर्यवंशी, निंबा बडगुजर, सय्यद झाकीर हुसेन, दिनेश चव्हाण, सुनील गायकवाड, रमेश बनकर, रवींद्र ठाकूर, यशवंत कापडे, डॉ. अ. फ. भालेराव, रमजान तडवी, प्रा. आत्माराम चिमकर, नामदेव पाटील, विलास मोरे, प्रा. वा. ना. आंधळे, रमेश धुरंधर, विनायक कुलकर्णी, सुधाकर वानखेडे, बुधा पाटील, भीमसिंग जाधव यांनी सहभाग घेतला. कविसंमेलनात रंगत आली होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक कुलकर्णी,वसंत पाटील,विश्वनाथ पाटील,गणेश पाटील, जगन महाजन नामदेव पाटील,भास्करराव बडगुजर यांच्या हस्ते संमेलनात सहभागी कविंना  प्रमाणपत्र देण्यात आले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह