जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । चोपडाचे नगरसेवक अशोक बाविस्कर यांच्या विद्याविहार कॉलनीतील घराच्या चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून २५ हजार किंमतीचा टीव्ही व ४० हजारांची रोकड असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २९ रोजी घडली. या प्रकरणी बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
नगरसेवक बाविस्कर २२ रोजी आपल्या कुटुंबासह शहरातील बारी वाड्यातील जुन्या घरी रेशन वाटप करण्यासाठी गेले होते. २९ रोजी सकाळी त्यांच्या विद्याविहार कॉलनीतील, दुमजली घरातील भाडेकरू सतीश सोनवणे यांनी त्यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती कळवली. त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप व कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. माहिती मिळाल्यावर बाविस्कर यांनी त्वरित घर गाठले. त्यावेळी ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

हे देखील वाचा :
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद






