जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनीक मुतारी बाहेरून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल लंपास केल्याची घटना २७ रोजी घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, शहरातील कांचन नगर वाणी गल्लीतील रहिवासी हेमकांत उत्तम बाविस्कर (वय-४८) खासगी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ ए एफ ८२१०) क्रमांकाची दुचाकी आहे. २७ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात असलेल्या मुतारीजवळ त्यांनी दुचाकी पार्क करून कामावर गेले. त्यानंतर अर्धातासानंतर आले असता. त्यांना दुचाकी आढळून आली नाही. परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला तरी देखील दुचाकीचा पत्ता लागला नाही.

हेमकांत बाविस्कर यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेवून दुचाकी चोरी झाल्याबद्दल तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.
हे देखील वाचा :
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
- भडगाव हादरले ! दारूच्या पैशांवरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पती अटकेत







