⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | अ‍ॅड.रोहिणी खडसेंनी कथन केली थरारक घटना : पिस्तूल, तलवार, लोखंडी रॉडने हल्ला

अ‍ॅड.रोहिणी खडसेंनी कथन केली थरारक घटना : पिस्तूल, तलवार, लोखंडी रॉडने हल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ ।  अ‍ॅड.रोहिणी खडसेंवर सोमवारी रात्री दुचाकीस्वार हल्लेखोरांनी मोठा हल्ला केला. हल्ल्यात खडसेंना दुखापत झाली नसून रात्री घडलेला सर्व प्रकार त्यांनी जसाच्या तसा कथन केला. अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या कि, सोमवारी रात्रीच्या सुमारास एकानं मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, सुदैवाने आम्ही बचावलो असे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तथा जिल्हा बँकेच्या संचालिका ऍड.रोहिणी खडसे यांनी सांगितले.

अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या कि, मी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना आमच्या कार क्रमांक एमएच १९ सीसी-१९१९ यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. अचानक तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तिघे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकानं मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, असं त्या म्हणाल्या.

‘मला मारण्यासाठीच हे तिघेजण आले होते. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. दरम्यान, या हल्ल्यात सुदैवाने मला कसलीही दुखापत झालेली नाही. परंतू हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगीतले. अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे जोरदार पडसाद उमटत असून पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे स्वतः मुक्ताईनगरला ठाण मांडून आहेत.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.