जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । शहरात एका भागात पतीला मारून टाकण्याची धमकी देऊन भावजयीचा दिराने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी दीर व सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर असे की, शहरातील एका भागात ती महिला एकटीच राहत असून, तिचा पती, सासरे व दीर हे दुसरीकडे राहतात. चार दिवसांपासून त्या महिलेचा पती तिच्या घरी आलेला नव्हता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ती महिला सासरी गेली होती. पतीविषयी तिने सासऱ्यांना विचारणा केली असता तो घरी आला नसून, मरुन गेल्याचे उद्धट उत्तर सासऱ्याने त्या महिलेला दिले. दिरालाही त्यांनी पतीबाबत विचारणा केली. त्याला मरू दे, असे म्हणत दिराने त्या महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले.

पतीला मारण्याची धमकीही त्याने दिली. सासऱ्यानेही शिवीगाळ करीत विनयभंग केला. दोघांच्या ताब्यातून सुटका करून महिला तेथून निघून गेली. याप्रकरणी महिलेने शहर पोलिसांत फिर्याद दिली.
हे देखील वाचा :
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद






