---Advertisement---
बातम्या

चोरीच्या दुचाकीसह चोरटा शहर पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्मचारी बुधवारी गस्तीवर असताना शाहूनगर परिसरातून एकाला चोरीच्या दुचाकीसह पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर दुचाकी चोरीची असल्याचा प्रकार उघड झाला.

chori city

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपेठ परिसरात असलेल्या इस्लामपुरा भागात राहणारे शेख समीनूर यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच.१९.एयु.०२२८ ही दि.२३ रोजी रात्रीच्या सुमारास घराजवळूनच चोरी झाली होती. बुधवार दि.२४ रोजी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस नाईक करुणासागर जाधव आणि पोलीस नाईक गजानन बडगुजर हे हद्दीत गस्तीवर होते. दुपारी ११.३० च्या सुमारास शाहूनगर परिसर गस्तीवर असताना त्यांना एक तरुण दुचाकीसह फिरताना दिसून आला.

---Advertisement---

पोलिसांनी त्याला थांबवत कागदपत्रांची मागणी केली असता त्याने ती दाखवली नाही. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ठोस विचारपूस केली असता दुचाकी दि.२३ रोजी चोरी झाल्याचे समजले. शहर पोलिसांनी दुचाकीसह नूर खान वय-२३ रा.शाहूनगर याला दुचाकीसह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---