भुसावळ कारागृहातील पोलीस नाईकला २ हजाराची लाच घेतांना अटक

नोव्हेंबर 15, 2021 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला भेटू देण्यासाठी २ हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अनिल लोटन देवरे असे अटक केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे.

lach jpg webp

तक्रारदार चे नातेवाईक कारागृहात असून त्यांना भेटू देण्यासाठी संशयित पोलीस नाईक अनिल लोटन देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून सोमवारी दि.१५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारतांना अनिल देवरे यांना रंगेहात अटक केली.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात हा सापळा रचण्यात आला होता. दरम्यान या घटनेमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now