पेट्रोल-डिझेलचे आजचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या नवे दर

नोव्हेंबर 7, 2021 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडूनही नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जळगावात आज पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.

petrol diesel

गेल्या दाेन-तीन महिन्यांपूर्वी शंभरी गाठलेल्या पेट्राेलचे दर बुधवारी रात्रीपर्यंत ११७ रुपये ११ पैसे तर डिझेलचे दर १०६ रुपये १८ पैसे हाेते. त्यात केंद्र शासनाने अबकारी शुल्क घटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंधनाचे दर कमी हाेणार असल्याने वाहनधारक काहीअंशी का असेना पण समाधानी आहेत. केंद्र शासनाच्या घाेषणेप्रमाणे जळगावमध्ये गुरुवारी (४ नोव्हेंबर) सकाळी पेट्राेल पंपांवर नवीन दरानुसार विक्री सुरू झाली. पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर विक्री झाले.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now